Priyanka Gandhi इंदिरा गांधींना कॉपी करू नका, माजी मुख्यमंत्र्यांचा प्रियंकांना इशारा

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर आपल्या पहिल्याच यूपी दौऱ्यात प्रियंका गांधी यांनी आपली ताकद दाखवून दिली. प्रियंका गांधी यांच्या रोड शोमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. याच वेळी प्रियंका यांच्यात काहींना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसली. याच अनुषंगाने लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये प्रियंका गांधी इंदिरा गांधींसह दिसल्या. परंतु यावरून त्या ट्रोलही झाल्या.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी प्रियंका गांधी यांना कानपिचक्या दिल्या आहेत. बादल यांनी प्रियंका गांधी यांना इंदिरा गांधींची नक्कल करू नका असा सल्ला दिला आहे. बादल म्हणाले, ‘प्रियंका गांधी इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात आणि त्या त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात असे ऐकले आहे. परंतु मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इंदिरा गांधींना थोडे देखील कॉपी करू नये, कारण इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीची कामं केली आहेत, ती पुन्हा होऊ शकत नाहीत.’

बादल पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी श्री हरमंदिर साहिब यांच्यावर हल्ला करवला होता. प्रियंका गांधींनी इंदिरा गांधींना कॉपी करू नये. तसेच प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्याने काँग्रेसला काहीही फायदा होणार नसल्याचेही बादल म्हणाले.