छोटा राजनमुळे त्रस्त झालाय हा माजी खासदार !

4
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तिहार जेलमध्ये कैद असलेला माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन सध्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनमुळे त्रस्त आहे. शहाबुद्दीलनला होणाऱ्या त्रासाचे कारण आहे छोटा राजनच्या कोठडीतून येणार टीव्हीचा आवाज. त्यामुळे आता शहाबुद्दीननेही कारागृह अधिकाऱ्याकडे स्वत:साठी टीव्हीची मागणी केली आहे. मी दिवसभर कोठडीत एकटा असतो. माझ्यासोबत बोलण्यासाठी कोणीही नाही, तसेच कोणाला भेटताही येत नाही. त्यामुळे मला टीव्ही देण्यात यावा अशी मागणी शहाबुद्दीनने केली आहे.
शहाबुद्दीनच्या बाजुलाच अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला ठेवण्यात आले आहे. शहाबुद्दीनने आरोप केला आहे की, छोटा राजन आणि इतर काही कैद्यांच्या खोलीतून टीव्हीवरील गाण्यांचा आवाज येत असतो . जर त्यांना टीव्ही पुरवला गेला ते मलाही टीव्ही देण्यात यावा अशी मागणी शहाबुद्दीनने अधिकाऱ्यांकडे केली आहे. शहाबुद्दीनला तिहार जेल नंबर एकमध्ये ठेवण्यात आले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या