उत्तरपत्रिका तपासण्यासाठी धमकी, माजी प्राध्यापकाची फेसबूक पोस्ट

सामना ऑनलाईन | मुंबई

मुंबई विद्यापीठातील तृतीय वर्षाचे निकाल अद्यापही लागलेले नाहीत. निकाल लवकर लागावे यासाठी विद्यापीठ प्रशासनाची धावपळ सुरु आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यातच उत्तरपत्रिका लवकर तपासा अशी धमकी विद्यापिठाचे अधिकारी विनायक दळवी देत असल्याचा आरोप माजी प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केला आहे. त्यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून असा आरोप केला आहे.

विद्यापीठानं काढलेलं सर्क्युलर प्राध्यापकांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र विनायक दळवी यांनी ६ तास काम न करणाऱ्या प्राध्यापकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं वक्तव्य केलं आहे. अपूऱ्या सोयी असताना देखील प्राध्यापकांना काम करत असताना धमकवल जात असल्याचं हातेकरांचं म्हणणं आहे. प्राध्यापक सुट्टीच्या दिवशी सुद्धा पेपर तपासणी करत असल्याने निकाल वेळेत लागेल अशी आशा आहे. विनायक दळवी अशी वक्तव्य करणार असतील तर त्यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागेल अशी मागणी नीरज हातेकरांनी केली.