प्रियकराच्या छळामुळे ही प्रख्यात टेनिसपटू मरणपंथाला टेकली होती

सामना ऑनलाईन । पॅरिस

२०१३ ची विंबल्डन चॅम्पियन मारियन बार्तोली निवृत्तीनंतर चार वर्षांनी २०१७ मध्ये जेव्हा टेनिस कोर्टवर परतली तेव्हा तिच्या चाहत्यांना एकच धक्का बसला होता. अंगाने सदृढ असलेली बार्तोली अगदी

बारीक झाली होती. फक्त बारीकच नाही तर तिच्या शरीराचा अक्षरश: सांगाडा झाला होता. त्यावेळी आजारपणामुळे बार्तोलीची ही अवस्था झाल्याचे समजले होते, मात्र तिच्या या अवस्थेसाठी आजारपणासोबतच तिचा माजी प्रियकर देखील तितकाच जबाबदार असल्याचे बार्तोलीने आता सांगितले आहे. तिच्या माजी प्रियकराने केलेल्या मानसिक छळामुळे तिची हि अवस्था झाल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

सुरूवातीपासूनच माझे वजन जास्त होते. २०१३ साली मी जेव्ही निवृत्ती घेतली तेव्हा मी फार खूष होते पण त्यानंतर माझ्या आयुष्यात माझा माजी प्रियकर पुन्हा आला आणि त्याने माझ्या आयुष्याची अक्षरश: वाच लावली त्यावरून माझा प्रियकर मला सतत टोमणे मारायचा. माझ्यासमोर बारिक मुलींची स्तुती करायचा. मला नको नको ते बोलायचा. तो मला जिवंतपणी नरकयातना देत होता. त्याच्या मानसिक छळामुळे माझे वजन आपोआप कमी होत होते. त्यानंतर मला हा त्रास सहन झाला नाही त्यामुळे आम्ही वेगळे झालो. पण तोपर्यंत माझे वजन फार कमी झाले होते. त्यामुळे माझ्या शरीराची प्रतिकार क्षमता देखील कमी झाली होती. त्यानंतर एकदा परदेश दौऱ्यावर असताना मी आजारी पडले. मला विषाणूंचा संसर्ग झाला होता. त्यात माझे वजन अधिक कमी झाले. मी अक्षरश: मरणाच्या दारातून परत आले आहे. त्यानंतर मला पुन्हा टेनिस कोर्टवर परतायचं होतं तेव्हा मी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला गेले तेव्हा त्यांनी मला मी जर टेनिस खेळले तर मला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असे सांगितले. ते ऐकून तर मला धक्काच बसला. पण त्यातूनही मी सावरून टेनिस खेळायला पुन्हा सुरूवात केली आहे. असे बार्तोली हिने सांगितले.

बार्तोलीने गेल्या काही महिन्यापासून टेनिस खेळायला सुरूवात केली असून ती येत्या मिआमी मास्टर्समध्येही सहभागी होणार आहे. त्या आधी मार्चमध्ये ती न्यूयॉर्कमध्ये एक सामना खेळणार आहे. “टेनिस कोर्टावर परत आल्यामुळे सध्या मी खूप आनंदी असते. माझ्या आयुष्यातील या घटनेमुळे दोन गोष्टी चांगल्या झाल्या एकतर मी मनाने कणखर झाले, माझी उर्जा वाढली त्यामुळे आता मी पुन्हा टेनिस कोर्टवर परतू शकले आहे. आणि तीन तास खेळून सामना जिंकण्याची ताकद व इच्छाशक्ती माझ्यात निर्माण झाली आहे. असे देखील बार्तोलीने सांगितले.