किल्ले बनवा, बक्षीस जिंका! स्पर्धेचा फॉर्म

2

सामना प्रतिनिधी । मुंबई

दिवाळी म्हटलं की फराळ-फटाक्यांप्रमाणे किल्ले बनवण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा जपण्यासाठी, विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि लढवय्या मावळ्यांच्या पराक्रमाची ओळख व्हावी म्हणून सामना ऑनलाइन ‘किल्ले बनवा, बक्षीस जिंका!’ ही स्पर्धा घेऊन आली आहे.

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना फोटो, व्हिडीओ आणि आपल्या ग्रूपची संपूर्ण माहिती आमच्याकडे ऑनलाईन पाठवावी लागेल. या स्पर्धेसाठी 4 ते 17 नोव्हेंबर 2018 यादरम्यान ही माहिती आपल्याला पाठवता येईल. पुढील फॉर्ममध्ये आपल्या ग्रूप लीडरचे नाव, इयत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी भरा माहिती. त्यानंतर पुढे Name of Participants मध्ये आपल्या ग्रूपमधील सर्वांची नावे आणि इयत्ता लिहा. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ अपलोड करा. व्हिडीओ असलाच पाहिजे असे बंधन नाही.

स्पर्धेचा फॉर्म

 

स्पर्धेचा निकाल 19 नोव्हेंबर रोजी आमचे फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवरून कळवला जाईल. आमच्या फेसबुक पेजला लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करण्यासाठी इथे क्लिक करा