दोन वेगवेगळ्या देशांकडून वर्ल्डकप खेळलेले खेळाडू

83

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आपल्या देशाकडून खेळण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. कारकीर्दीमध्ये एकदा तरी वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व करावे अशी खेळाडूंची इच्छा असते. परंतु काही असेही खेळाडू आहे ज्यांनी चक्क दोन वेगवेगळ्या देशांकडून वर्ल्डकप खेळला आहे. यातील एक खेळाडू तर यंदा आपल्या संघाचे कर्णधारपदही भूषवत आहे. चला तर पाहूया कोण आहेत हे खेळाडू…

कॅपलर वेसेल्‍स –

kepler-wessels
कॅपलर वेसेल्स हे दोन देशांकडून एक दिवसीय वर्ल्डकप खेळणारे क्रिकेट इतिहासातील पहिले खेळाडू आहेत. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांकडून वर्ल्डकप खेळला आहे. कॅपलर यांनी 1982 ला ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी एकदिवसीय संघामध्ये स्थान मिळवले आणि आणि 1983 चा वर्ल्डकप खेळला. यानंतर त्यांनी 1992 ला दक्षिण आफ्रिकेकडून वर्ल्डकप खेळला. विशेष म्हणजे ते संघाचे कर्णधार होते.

अँडरसन कमिन्स –

anderson-cummins
कॅपलर वेसेल्स यांच्यानंतर दोन वर्ल्डकप खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरा नंबर अँडरसन कमिन्स यांचा नंबर लागतो. 53 वर्षीय अँडरसन यांनी 1992 च्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्यांनी 12 बळी घेतले होते. यानंतर चक्क 15 वर्षांनी ते वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसले. 2007 चा वर्ल्डकप ते कॅनडाकडून खेळले.

एड जोएस –

ed-joyce
डावखुरा फलंदाज एड जोएस याने इंग्लंड आणि आयर्लंडकडून वर्ल्डकप खेळला आहे. 2007 मध्ये एड हे इंग्लिश क्रिकेट संघाचे सदस्य होते, तर 2011 चा वर्ल्डकप त्यांनी आयर्लंडकडून खेळला. एड यांनी कारकीर्दीत 78 एकदिवसीय लढतीत 2622 धावांची लूट केली आहे. यात त्यांच्या 6 शतकांचा समावेश आहे.

इयान मोर्गन –

eoin-morgan
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये यजमान इंग्लंडचे कर्णधारपद भूषवत असणारा इयान मॉर्गन यानेही दोन देशांकडून वर्ल्डकप खेळण्याचा मान मिळवला आहे. 2006 मध्ये आयर्लंडकडून एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या इयान मॉर्गन 2007 मध्ये वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला. या वर्ल्डकपनंतर त्याने 2009 ला इंग्लंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि संधीचा फायदा उठवत नियमीत सदस्य झाला. 222 एक दिवसीय लढतीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलेल्या मॉर्गनने 2011 आणि 2015 चा वर्ल्डकप खेळला आणि आता 2019 च्या वर्ल्डपसाठी सज्ज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या