केळवे समुद्रात चार पर्यटक बुडाले

सामना ऑनलाईन । पालघर

केळवे येथे फिरण्यासाठी आलेले चार पर्यटक येथील समुद्रात बुडाले आहेत. हे सर्वजण नालासोपाऱ्याचे रहिवासी होते. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध घेण्यात येत आहे.

रविवारची सुट्टी असल्याने नेहमीप्रमाणेच केळवे बीचवर पर्यटकांची गर्दी होती. दुपारी समुद्राला भरती आली होती. त्याचवेळी अनेकजण लाटांबरोबर खेळण्यासाठी पाण्यात उतरले होते. यात चार तरुणांचाही समावेश होता. लाटांबरोबर खेळताना हे चारही जण आत खेचले गेले. यातील कोणालाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले व बघता बघता समुद्रात खेचले गेले.