मृतदेहासोबत सेल्फी काढणे पडले महाग, हॉस्पिटलच्या चार कर्मचार्‍यांचे निलंबन

सामना ऑनलाईन । हैद्राबाद

दिवंगत एनटी रामाराव यांचे सुपुत्र आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे मेव्हणे हरिकृष्णा यांचा बुधवारी एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहासोबत सेल्फी काढल्याप्रकरणी इस्पितळातील ४ कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच या चारजणांविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे आहे.

अभिनेता व राजकारणात सक्रीय असलेले नंदामूरी यांचा २९ ऑगस्ट रोजी एका अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर हरिकृष्णा यांचा मृतदेह नरकेटपल्ली येथील कामनेनी इस्पितळात दाखल करण्यात आले. हरिकृष्णा यांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर आयसीयुमधून बाहेर आले. यावेळी मृतदेह साफ करताना चार कर्मचार्‍यांनी सेल्फी काढला. यातील नरसिंह यांनी हा सेल्फी व्हॉट्सऍपवरून मित्रांसोबत शेअर केला. त्यानंतर हा फोटो चांगलाचा व्हायरल झाला होता.

इस्पितळ प्रशासनाने या चौघांविरोधात निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्या विरोधात पोलिसांडे तक्रार केली आहे. मृतदेहाची विटंबना केल्याचा आरोप या कर्मचार्‍यांवर करण्यात आला आहे.

एनटी रामाराव यांचे सुपुत्र नंदामुरा हरिकृष्णा यांचे २९ ऑगस्ट रोजी अपघातात मृत्यू झाला. हरिकृष्णा एका लग्न समारंभात जात होते. प्रवासादरम्यान त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि डिवाईडरला गाडी धडकली. या भीषण अपघातानंतर त्यांना इस्पितळात दाखल केले पण उपचारादरम्यान त्यांच मृत्यू झाला.