हजला पाठवतो म्हणून 27 यात्रेकरुंची फसवणूक

10
बहिणीला बाहेर फिरण्याची आवड असल्यास तिला ट्रॅव्हल पॅकेज गिफ्ट देऊ शकता.

सामना प्रतिनीधी । लातूर

हजला पाठवतो म्हणून 27 यात्रेकरुंकडून 9 लाख 50 हजार रुपये जमा करून घेऊन फसवणूक करण्यात आली. पैसे परत मागितले असता जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

या प्रकरणी शेख कासीम महमद साहब सेवानिवृत्त मेवानिक यांनी तक्रार दाखल केली. मागील तीन वर्षापासून फिर्यादी हे असील टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स मुंबई, अलबुराक टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स मुंबई यांचे सबएजन्ट म्हणून लातूरात काम करीत होते. देशातून सौदी अरबला हज यात्रेला पाठवण्यासाठी 15 दिवसाची स्किम करून प्रत्येकी 35 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. 27 जून 2018 पासून एकूण 27 यात्रेकरुंचे 9 लाख 50 हजार रुपये जमा केले. ऑक्टोबर – नोव्हेंबर 2018 मध्ये या सर्व लोकांना मुंबईवरून हज ला पाठवण्याचे ठरविण्यात आले होते. 27 लोकांचे जाण्या-येण्याचे विमानाचे तिकीट, मक्का येथे सात दिवस राहणे, खाणे, पिण्याची व्यवस्था, तसेच मदीना येथे सात दिवस राहणे, खाणे, पिण्याची व्यवस्था व बसची व्यवस्था करण्याचे ठरले होते. 17.10 2018 रोजी

27 लोक लातूरवरुन मुंबईला आले. केवळ १३ लोकांनाच जाण्या-येण्याचे तिकीट देऊन पाठवून देण्यात आले. 14 यात्रेकरुंना शेवटपर्यंत पाठवलेच नाही. ज्या 13 यात्रेकरुंना मक्का येथे पाठवले तेथे केवळ चार दिवसाची त्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती त्यानंतर या सर्वांना हॉटेलमधून हाकलून देण्यात आले. उर्वरित दिवस पुटपाथवर राहून सर्वांना काढावे लागले. 4 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबईला परत येत असताना त्या सर्वांचे परतीचे तिकीट रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले. कशीबशी व्यवस्था करून सर्वजण मुंबई परत आले. असिल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचे मुंबई आणि संभाजीनगर येथील कार्यालय बंद करून सर्वजण पळून गेले होते. मिर इरशाद अली व मिर जाहीद अली रा. प्रियदर्शनी कॉलनी पडेगाव संभाजीनगर यांचे जानेवारी 2019 मध्ये भेट झाली. चार दिवसाच्या वाटाघाटीनंतर त्यांनी 14 यात्रेकरुंना पाठवले नाही म्हणून 4 लाख 53 हजार रुपये धनादेश व यात्रेकरुंच्या झालेल्या त्रासाची भरपाई म्हणून 1 लाख 95 हजाराचा धनादेश दिला. मात्र सदरील धनादेश वटले नाहीत. अलबुराक मुंबईचे मालक किंवा मॅनेजर इम्रान यांच्याकडून प्रत्येकी 23 हजार 877 परतीच्या तिकीटाचे पैसे घ्यावेत म्हणून सांगितले. मुंबई येथे गेल्यानंतर तिथले ऑफीस बंद झाल्याचे समजले. मॅनेजर इम्रान याची भेट झाली मात्र त्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. 27 यात्रेकरुंची 9 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली म्हणून मिर इरशाद अली, मिर जाहीर अली, अलबुराक ,कंपनीचा मालक व इम्रान व्यवस्थापक यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या