एअरटेलचे देशभरात रोमिंग फ्री

सामना ऑनलाईन,मुंबई

रिलायन्स जिओशी दोन हात करण्यासाठी आज भारती एअरटेलनेही देशभर रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना आता कॉल आणि डेटावर रोमिंगपोटी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याचा देशभरातील २६.८ कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे.याआधी बीएसएनएल, क्होडाफोन आणि रिलायन्स जिओने रोमिंग फ्री केल्याची घोषणा केली होती. एअरटेलने देशभरात रोमिंग फ्री केल्याची अधिकृत घोषणा ‘ट्विटर’द्वारा केली आहे. रिलायन्स जिओने टेलिकॉम नेटकर्क क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.