दीडशे रुपयांना मिळते ताजी हवा

सामना ऑनलाईन, बिजिंग

खाण्या-पिण्याच्या वस्तू बंद पाकिटात विकत मिळतात हे तुम्हाला माहिती असेलच, पण ताजी हवासुद्धा बंद पाकिटात विकत घेता येते हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. चीनमधील लोक सध्या घरबसल्या ताज्या हवेचा आनंद घेत आहेत तोही फक्त दीडशे रुपयांत. येथील जिनिंग प्रांतात राहणाऱ्या दोन बहिणींनी ताजी हवा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

चीनमधील प्रदूषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन हा व्यवसाय उभा राहिला असून आतापर्यंत सुमारे १०० पाकिटे विकल्याचा दावा या दोघींनी केला आहे. यापूर्वी कॅनडामधील एका कंपनीने हवा विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. ही कंपनी डोंगराळ भागातील स्वच्छ व शुद्ध हवा बंद पाकिटात भरून विकत होती.