मैत्रीण

प्रसाद खांडेकर

प्यार दोस्ती है

तुमची मैत्रीण…अल्पा

तिच्यातली सकारात्मक गोष्ट…प्रत्येक प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहते.

तिच्यातली खटकणारी गोष्ट…कधी कधी मूडी वागते.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट…माझा मुलगा श्लोक

तिच्याकडून काय शिकलात ?…कोणतीही गोष्ट करायच्या आधीच तिला नकार देऊ नये. नेहमी सकारात्मक कसं राहायचं हे शिकलो.

 तिचा आवडता पदार्थ…खांडवी आणि मांसाहार

ती निराश असते तेव्हा…फारशी नसते. असलीच तर गाणी ऐकते.

एकमेकांसाठी वेळ देता का ?…माझ्यामुळे कधी कधी शक्य होत नाही, पण जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही नक्कीच वेळ काढतो. प्रयोग नसेल तेव्हा तिच्याबरोबर राहणं पसंत करतो.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण…महाविद्यालयात असताना पंतनगरचा बसस्टँण्ड, बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक ६

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…आम्ही मनालीला फिरायला गेलो होतो त्यावेळी बर्फात राहण्याची सवय नसल्यामुळे माझे हात खूप गारठलेले होते. तेव्हा मी लेखक आहे. माझ्या बोटांना काही झालं तर लिहू कसं शकणार या विचाराने रडू येत होतं. त्यावेळी ती पूर्वी मनालीला जाऊन आल्यामुळे मला तिने खूप सांभाळून घेतलं. विनोदी प्रसंग असला तरी हा प्रसंग माझ्या खूप लक्षात राहला.

तुम्ही चुकता तेव्हा तो काय करते…चूक निदर्शनास आणून देते. कधी कधी सल्लेही देते. बऱयाचदा काय करावं यापेक्षा काय करू नये हेही सांगते. योग्य मार्गदर्शन करते.

भांडण झाल्यावर काय करता ?…खूप कमी वेळा भांडण होतं. शक्यतो मी शांत राहण्याचा पर्याय अवलंबतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?…तिला

तुमची एखादी तिला आवडणारी सवय…माझं अरबट चरबट खाणं, माझा वेंधळेपणा तिला अजिबात आवडत नाही.

तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या?…मैत्रीची व्याख्या करता येत नाही. मैत्री अनुभवायला हवी.

तुम्हाला ती कशी हसवते?…बाईकवरून फिरायला जातो. त्यामुळे उत्साहित व्हायला होतं.

एकत्र पाहिलेला सिनेमा?…फास्टर फेणे

एकत्र फिरायला जायचे ठिकाण ?…आम्हा दोघांनाही पर्यटनाची आवड आहे. माथेरान, कोकण किंवा नाटकाच्या दौरे असलेल्या ठिकाणी जातो.

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ?…ती महाविद्यालयात असताना फारशी बोलायची नाही. तिच्याशी संवाद साधण्याकरिता मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दहा वर्षांनी लग्न केलं.