उधार पैसे देण्यास मित्राचा नकार, रागात तरुणाचा कानाचा घेतला चावा

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत कानपूरमधून दररोज अशा काही बातम्या समोर येत आहेत ज्या संपूर्ण देशाला हादरवून टाकत आहेत. कानपूरमध्ये दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणाची ताजी बातमी समोर आली आहे. यामध्ये एक मुलगा दुसऱ्याकडे उधारीचे पैसे मागण्यासाठी आला होता. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने कान कापून पळ काढला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार कानपूरच्या बाबूपूरवा येथील रहिवासी मिलन गुप्ता आणि शुभम यांच्यात हे प्रकरण घडले. 2 डिसेंबर रोजी मिलन गुप्ता एका हॉटेलमध्ये चहा पित असताना शुभम नावाचा मुलगा तिथे आला. शुभमने मिलनकडून 2 हजार रुपये उधार मागितले. मिलनने सांगितले की, त्याच्याकडे सध्या पैसे नाहीत. मात्र शुभमने पैसे मिळवण्यासाठी हट्ट सुरू केल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. दरम्यान वादाचं रूपांतर मारामारीत झाले. त्यानंतर वादातून शुभमने मिलनचे कान कापले. तसेच त्याला धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर मिलनला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मिलनवर प्रथम शस्त्रक्रिया करून तोडलेला कान जोडला. याप्रकरणी मिलन गुप्ता यांनी बाबूपूरवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेबाबत एसीपी अमरनाथ सांगितले की, मिलन गुप्ता यांचे शुभमशी पैशावरून भांडण झाले आणि शुभम कान चावल्यानंतर पळून गेला. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.