मैत्रीण

अनिल गवस

साधी.. सरळ.. भोळी…

तुमची मैत्रीण…श्रद्धा गवस

तिच्यातली सकारात्मक गोष्ट…सतत कामात असते. माझ्या कुटुंबीयांशी मिळूनमिसळून राहते.

तिच्यातली खटकणारी गोष्ट…खूपच लळा लावते.

तिच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट…माझा मुलगा.

तिच्याकडून काय शिकलात ?…मी खूप शांत झालो. माझा रागीट स्वभाव कमी झाला.

तिचा आवडता पदार्थ…फालुदा.

ती निराश असते तेव्हा…निराशेचे प्रसंग मला सांगते. मी त्या प्रसंगांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा हे तिला सांगण्याचा प्रयत्न करतो.

एकमेकांसाठी वेळ देता का ?…हो.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण…माझ्या गावी. निसर्गसौंदर्यात रमायला आम्हाला आवडतं.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण…लग्नानंतरचे क्षण.

तुम्ही चुकता तेव्हा ती काय करते?…खूप बोलते.

भांडण झाल्यावर काय करता ?…ती माझ्याशी बोलत नाही आणि मीही स्वतःहून दोन दिवस मुद्दाम अबोला धरतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ?…तिला येतो. पूर्वी रागीट होतो, पण आयुष्याचं भान येत गेलं म्हणून रागाची जागा आनंदाने घेतली. आता मी दोन्ही बाजू बघतो.

त्याचं वर्णन…पत्नी, मैत्रीण, सहचारिणी आणि सुगृहिणी म्हणून ती अप्रतिम आहे.

तुझी एखादी तिला आवडणारी सवय…मी माणसांमध्ये खूप वेळ गुंततो यामुळे घरी जायला उशीर होतो.

तुझ्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या…एकमेकांना समजून घेऊन एखाद्यावर त्याच्या गुणदोषांसकट प्रेम करणं याला मैत्री म्हणतात.

एकत्र फिरायला जायचे ठिकाण ती खूपच गृहकृतदक्ष असल्यामुळे बाहेर जाणं होत नाही.

तिच्याशी मैत्री का करावीशी वाटली ?…कारण ती फार भोळी, सरळ आहे.