डॉक्युमेंट्रीवरून FTII मध्ये वाद, विद्यार्थ्याचा ‘अभाविप’वर आरोप

सामना ऑनलाईन, पुणे

पुण्यातील एफ.टी.आय.आय.मध्ये नवा वाद निर्माण झालाय. हरीशंकर नाचीमुत्थू या माजी विद्यार्थ्याने ‘होरा’ एक माहितीपट तयार केलाय. कबीर कला मंचच्या दृष्टीकोणातून सामाजिक, आर्थिक परिस्थिती या माहितीपटाद्वारे दाखवण्यात आली आहे. मात्र एफटीआयआयने सुरक्षेच्या कारणास्तव हा माहितीपट दाखवण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.  एफटीआयआयच्या तपासणी समितीने हा माहितीपट बघितला होता आणि त्यांनी या माहितीपटामध्ये काहीच आक्षेपार्ह नसल्याचं म्हटलं होतं. अभाविपने या माहितीपटाला आक्षेप घेत धमक्या दिल्या ज्यामुळे हा माहितीपट दाखवण्यास ऐनवेळी नकार देण्यात आला असा आरोप नाचीमुत्थू याने केला आहे. या माहितीपटामध्ये आक्षेपार्ह काहीच नसून पोलिसांच्या परवानगीनंतरच या माहितीपटाचं चित्रीकरण करण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. अभाविपने धमक्या दिल्याने हा माहितीपट दाखवण्यास मनाई केल्याचा आरोप केला जातोय. मात्र हे आरोप अभाविपने फेटाळून लावले आहेत. आमचे कोणताही कार्यकर्ता FTII मध्ये गेलेला नाही. जो विद्यार्थी आरोप करत आहे ते खोटं असल्याचं अभाविपचे महानगरमंत्री अनिल ठोंबरे यांनी म्हटलं आहे.