पंचायतराज समितीसाठी जिल्हाभरातून रक्कम जमा करण्याचे काम सुरु

सामना प्रतिनिधी । लातूर

आज पासून लातूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीच्या परिक्षणाच्या कारणावरुन लातूर जिल्ह्यात निधी गोळा करण्याची मोहिमच उघडण्यात आली आहे. लाखो रुपयांचा निधी जमवण्यात येत आहे.

तब्बल ९ वर्षानंतर लातूर जिल्ह्यात पंचायतराज समिती आलेली आहे. या समितीमध्ये २८ आमदारांचा समावेश आहे. या समितीच्या नावाने जिल्ह्यात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात येत आहे. एक हजार ते पाच हजार अशी मागणी करण्यात येत आहे. या समितीचे बालंट टाळण्यासाठी म्हणून ही रक्कम गोळा करण्यात येत आहे. लाखो रुपये या निमित्ताने गोळा केले जात आहेत. लातूर जिल्ह्यात समिती आली ही कांही जणांना पर्वणीच वाटत आहे. समितीच्या नावावर पैसे गोळा करण्याचा गोरखधंदा माञ जोरात सुरु आहे.