महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा

सामना प्रतिनिधी । मुंबई

स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज विजयादशमीच्या मुहूर्तावर मालाड येथील मनोरी गाव येथून महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराजांची पालखी व रथाची मिरवणूक काढण्यात आली. आश्रमाचे मुख्य व्यवस्थापक निशाद पाटणकर, शिवसेनेचे मालाड विधानसभा संघटक मधुकर राऊत यांच्या हस्ते पालखी मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी राजेंद्र शिंदे, शेखर परब, साधुसंत उपस्थित होते. या दर्शन सोहळ्य़ानिमित्त उद्या १ ऑक्टोबर रोजी ओम् साई रेल्वे प्रवासी मंडळाचे भजन, महादेव मोरे यांचे कीर्तन होईल. २ ऑक्टोबर रोजी छप्पन भोग नैवेद्य अर्पण सोहळा, ३ ऑक्टोबर रोजी श्रीमद्भागवत कथा प्रवचन, ३ ऑक्टोबर रोजी भंडारा, ३ ऑक्टोबरला शाहीर रूपचंद चव्हाण यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ६ वाजता १०८ समई प्रज्वलित करून दीप महोत्सव होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी श्री गुरू सप्तशती पारायण होणार आहे.