माघातील उत्सव

खापरादेव मंडळाच्या वतीने २१ ते २५ जानेवारीदरम्यान ‘माघी श्री गणेश जयंती’ उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव करी रोड पूर्व येथील रामदूत वसाहत पटांगणात होणार असून यंदा या उत्सवाचे १८वे वर्ष आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. २० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ‘बाप्पाचा भव्य आगमन

मिरवणूक सोहळा’ होणार असून मुंबईतील नामांकित वंदन ढोलपथक खास आकर्षण असणार आहे. २१ जानेवारी रोजी विभागातील महिलांच्या हस्ते आरती, मंगळागौर कार्यक्रम होणार आहेत. २२ ते २५ जानेवारी दरम्यान काकड आरती, २२ जानेवारी रोजी मुंबईच्या डबेवाल्यांना आरतीचा मान, रात्री श्री सिद्धीविनायक दशावतार मंडळ (कणकवली), २३ जानेवारी रोजी सत्यनारायणाची महापूजा, बाप्पाची आरती, सुस्वर भजन, २४ जानेवारी रोजी मुंबईच्या पोलिसांना आरतीचा मान, २५ जानेवारी रोजी श्रींचे विसर्जन होईल.