सामाजिक संदेश देण्यासाठी १६ वर्षांचा गणेश ४८९ किमी धावला

सामना प्रतिनिधी । मुंबई

सामाजिक संदेश देण्यासाठी १६ वर्षांचा गणेश बट्टू (रुईया कॉलेजचा विद्यार्थी) ४८९ किमी धावला आहे. मुंबई आध्र महासभा आणि जिमखान्याचा खेळाडू असलेला गणेश आतापर्यंत ५० मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला आहे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतनिधी, नेत्रदान, कॅन्सरच्या रुग्णांना मदत, मुलींचे शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता, प्राण्याचे रक्षण, आरोग्य अशा अनेक विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी गणशे विविध मॅरोथॉनमध्ये सहभागी झाला.