परदेशातील गणेशोत्सव

सामना ऑनलाईन। मुंबई

गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की गणेशाच्या आगमनाची ही लगबग आपल्याकडेच नाही तर परदेशातही सुरू आहे. गेल्या काही वर्षात परदेशातही गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत असल्याचं दिसत आहे. जाणून घेऊ या अशाच काही देशातील गणेशोत्सवाबदद्ल.

ganesh-uk

इंग्लंड
गेल्या काही वर्षात अनेक हिंदू नागरिक इंग्लड व युरोपिय देशांत स्थलांतरीत झाले आहेत. सर्वप्रथम २०१५ साली येथील विश्व हिंदू मंदिरात पहिल्यांदा गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली होती. हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लंडनमधील मंदिरे, गुरद्वारा आणि विविध हिंदू संघटनांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर दरवर्षी गणेशोत्सव येथे दणक्यात साजरा करण्यात येतो. ढोल ताशा बरोबरच टाळ मृदुंगाच्या गजरात गोऱ्यांच्या देशात बाप्पाची मिरवणूक काढली जाते. दहा दिवस इंग्लंडमधील वातावरण पूर्ण बाप्पामय  होऊन जातं. यात ख्रिश्चन नागरिकही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत मोदकाचा आस्वाद घेतात. अनंत चतुर्थीला येथील थेम्स नदीत बाप्पाचं विसर्जन केलं जात.

marris-ganesh

मॉरिशस

मॉरिशस मध्ये हिंदूंची लोकसंख्या ही ५२ टक्के आहे. यामुळे गणेशोत्सवाबरोबरच हिंदूचे सगळेच सण येथे साजरे केले जातात. येथे १८९६ पासून गणेशोत्सव साजरा होत आहे. येथे स्थायिक झालेल्या भिवजाई कुटुंबाने सर्वप्रथम गणेशोत्सवाची प्रथा येथे सुरू केली. हळूहळू याबदद्ल देशभरात चर्चा होऊ लागली आणि मग सगळेच हिंदू बांधव भिवजाई कुटुंबाच्या गणेशोत्सवात सहभागी होऊ लागले. हिंदू नागरिकांचे गणपती प्रेम बघून मॉरिशस सरकारने गणेश चतुर्थीला सरकारी सुट्टीही जाहीर केली आहे. गणेश चतुर्थीला येथे बाप्पाची मोठी मिरवणूक काढली जाते. शोभा यात्राही काढली जाते. यात हिंदूबरोबरच सर्वधर्मीय धर्माचे लोक सहभाग घेतात.

france-ganesh

फ्रान्स

फ्रान्समध्येही गणेश चतुर्थी धूमधडाक्यात साजरी केली जाते. येथील श्री मणिक्का विनायकर मंदीरात हा उत्सव साजरा केला जातो. दहा दिवस बाप्पाची मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते. ज्या रस्त्यावरुन बाप्पाची मिरवणूक निघते तो पाण्याने धुतला जातो. अनंत चतुर्थीला हिंदूंबरोबरच, श्रीलंकन व युरोपियन नागरिक बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र येतात.

us-ganesh

अमेरिका
अमेरिकेतही मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. येथील साई संस्थान व विविध हिंदू संघटना या उत्सवात सहभाग घेतात. येथील न्यूयॉर्क, मियामी, फ्लोरिडा, सॅन फ्रान्सिस्को याचबरोबर इतर अनेक भागात हिंदू नागरिक गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. येथील हिंदू नागरिक दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. यात सगळ्याच जाती धर्माचे लोक आनंदाने सहभागी होतात.

china-ganesh-fest

चीन
चीनमध्येही गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बँजोच्या दणदणाटात येथील तरुणाई बाप्पाचे स्वागत करते. विशेष म्हणजे येथे बाप्पाची आरती चीनी भाषेत केली जाते.

japan-ganesh

जपान
जपानमध्येही मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपतीला येथे कनिगेतन (Kangiten) असे संबोधले जाते. बाप्पाचा संबंध जपानमधील बौद्ध संस्कृतीशी असल्याची येथे दंतकथा आहेत. त्या कथेनुसार ८ व्या आणि ९ व्या शतकात गणपती हिंदुस्थानमधून फिरता फिरता चीन व नंतर जपानमध्ये आले होते. तिथे त्यांचे बराच काळ वास्तव्य होते. येथे गणपती म्हणजेच कनिगेतनची पूजा प्रामुख्याने व्यवसायिक आणि कलाकार व्यक्ती करतात.

summary-ganesh-festival-in-foreign