अमेरिकेतील गणेशोत्सव

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेतील शार्लेट, उत्तर कॅरोलिना येथे मराठे दाम्पत्य गेल्या ४ वर्षांपासून त्यांच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करते. यंदाही त्यांच्या घरी सुंदर मखर आणि सजावट करण्यात आली होती. मखरात मनस्वी मराठे यांनी स्वतः तयार केलेला गणपती बाप्पा थाटामाटात विराजमान झाला होता.

bappa-america-2

घरच्या गणपती प्रमाणेच शार्लेट मराठी मंडळाच्या गणेशोत्सवाचे कामही मिलिंद मराठे उत्साहाने करतात. मिलिंद मराठे हे अमेरिकेतील कॅरोलिना येथील शार्लेट मराठी मंडळाचे सार्वजनिक गणेशोत्सव २०१७ चे अध्यक्ष होते. मंडळाच्या गणेशोत्सवाची सांगता ‘शिवस्य ढोल ताशा’ पथकाच्या गजरात मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. अमेरिकेत राहून प्रत्येक मराठी उत्सव उत्साहाने साजरे करणारे मराठे दाम्पत्य आणि शार्लेट मराठी मंडळ नक्कीच कौतुकास पात्र आहेत.

bappa-america-1