मित्राबरोबर फिरायला गेलेल्या तरुणीवर 11 जणांचा सामूहिक बलात्कार

18
प्रातिनिधिक फोटो


सामना ऑनलाईन । लुधियाना

पंजाबमधील लुधियाना शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी एक तरुणी आपल्या मित्रासोबत मुल्लापूर भागात फिरायला गेली. तेव्हा काही लोकांनी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

रविवारी रात्री तरुणी आपल्या मित्रासोबत मुल्लापूर भागात फिरत होती. तेव्हा दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी तरुणीच्या मित्राला मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. त्यानंतर तरुणीला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर ११ जणांनी बलात्कार केला. नराधम यावरच न थांबता तरुणीच्या मित्राच्या घरच्यांकडून 2 लाख रुपयांची खंडणीही मागितली होती. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यावर कसून तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या