तारापूर एमआयडीसीमध्ये गॅसची गळती, 3 कामगार गंभीर


सामना ऑनलाईन । पालघर

पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या तारापूर एमआयडीसीमधील यूपीएल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बोर्मिन गॅसची गळती झाली आहे. गॅसगळती झाल्याने कंपनीत काम करणाऱ्या तीन कामगारांची प्रकृती गंभीर झाली आहे. उमेश कुमार (25), कृष्णा यादव (24), प्रवीण गोलाने (35) अशी जखमी कामगारांची नाव असून त्यांना उपचारासाठी बोईसरमधील तुंगा हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आले आहे. तारापूर एमआयडीसीमध्ये या आधीही गॅसगळती, तसेच स्फोट झाल्याने अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.