खडकी दारूगोळा कारखान्यात वायुगळती; 150 जणांना बाधा

40

सामना ऑनलाईन।  पुणे

खडकीच्या अतिकिस्फोटक (एच. ई. फॅक्टरी) दारूगोळा कारखान्यातील प्लँटमध्ये आज सकाळी कायुगळती झाली. यामुळे शेजारच्या ऍम्युनिशन फॅक्टरीतील 150 कामगारांना त्याची बाधा झाली आहे. अतिकिस्फोटक कारखान्याच्या 49 क्रमांकाच्या इमारतीतील एका प्लँटमध्ये सकाळी दहाच्या सुमारास कायुगळती सुरू होताच त्याची लागण शेजारच्या दारूगोळा कारखान्यातील सुमारे 150 कामगारांना झाली. मळमळणे, उलटी होणे, गळा दुखणे आदी त्रास या कामगारांना सुरू झाल्यामुळे तातडीने या सर्क कामगारांना फॅक्टरी रुग्णालयात आणण्यात आले. त्यातील 45 कामगारांना अधिकच त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या