पैठणचा गौरव देशपांडे लष्करात लेफ्टनंट

8


सामना प्रतिनिधी । पैठण

पैठणच्या गौरव देशपांडे यांची हिंदुस्थानी लष्करात ‘लेफ्टनंट’पदी निवड झाली असून, शहर व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

नुकतेच एस.एस.बी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गौरव अरुण देशपांडे यांचा देशातून एकूण १५० च्या गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक आला आहे. गौरव देशपांडे यांचे शालेय शिक्षण पैठण येथील सेंट पॉल इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर जे.एन.ई. कॉम्प्युटर इंजिनीअिंरंगचे शिक्षण त्यांनी संभाजीनगर येथे पूर्ण केले. गौरव देशपांडे यांचा शालेय जीवनापासूनच लष्कराकडे ओढा होता. जिद्द व चिकाटीमुळे त्याचे स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया त्यांचे पालक लक्ष्मीकांत जोशी यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.

येत्या ऑक्टोबरपासून देशपांडे हे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. या यशाबद्दल आमदार संदिपान भुमरे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, शहरप्रमुख प्रकाश वानोळे, युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी किशोर चौधरी, नगराध्यक्ष सूरज लोळगे, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी, माजी नगराध्यक्ष शेखर पाटील, दारूबंदी अधिकारी जयवंत पाटील, नामदेव खराद व माजी उपनगराध्यक्ष दिलीप पोहेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या