कुटुंब रंगलय ‘जागरण-गोंधळात’

सामना ऑनलाईन । मुंबई

कलर्स मराठीवरील ‘घाडगे ऍण्ड सून’ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरण आहे. अक्षय-अमृताचे नवरा-बायकोचे नाते खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतला. जेजुरीला पोहोचताच घाडगे वाड्यावर अक्षय आणि अमृताच धूमधडाक्यात स्वागत झाले. नव्या नवरीप्रमाणे तिचा गृहप्रवेश वाड्यामध्ये करण्यात आला. हे सगळें बघून माईंना खूपच आनंद झाला आहे. आता अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे. हा जागरण-गोंधळाचा विधी निर्विघ्नपणे पार पडेल ? अमृताच्या समोर आणखी कोणते सत्य येणार आहे ? ते सत्य कळल्यावर माईंना हे सत्य अमृता सांगू शकेल ? हे सगळे येत्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.