भूत बघायचंय? मग चला घोस्ट टूरिझमला

सामना ऑनलाईन।

परदेशाप्रमाणेच आता आपल्या देशातही घोस्ट टूरिझम लोकप्रिय होत आहे. भीती, कुतूहलता, उत्सुकता याबरोबरच एखाद्या गोष्टीमागचं सत्य पडताळून बघण्याची ईच्छा व धाडस असेल तर घोस्ट टूरिझम तुमच्यासाठीच आहे.

bhangarhभानगड…राजस्थान
राजस्थानमधील भानगड किल्ला हा शापित किल्ला असल्याचं बोललं जात. भानगडची राणी सौंदर्यवती होती. एक मांत्रिकाचे तिच्यावर मन आले. तिला मिळवण्यासाठी त्याने तंत्रमंत्राचा वापर केला. त्यासाठी त्याने राणीच्या जवळील दासीला हाताशी घेतले. राजाला हे कळताच त्याने मांत्रिकाचा शिरच्छेद केला. मात्र मरण्यापूर्वी मांत्रिकाने राजाला व त्याच्या प्रजेला शाप दिला. त्यानंतर मांत्रिकाचे मुंडके उडवण्यात आले. पण त्यानंतर लगेचच संपूर्ण भानगड कोसळले. एका रात्रीत संपूर्ण भानगड नष्ट झाले. नागरिक व राजा राणी अचानक बेपत्ता झाले. पण आजही रात्रीच्या वेळी या ठिकाणी बायका, लहान मुलांचा रडण्याचा आवाज येतो. त्यांचे अस्तित्व तिथे असल्याचे जाणवते असे सांगितले जाते. यामुळे संध्याकाळी सहानंतर येथे जाण्यास परवानगी नाही.

cannt-delhiकान्ट …दिल्ली
दिल्लीतील कान्ट परिसर दिवसभर गजबजलेला असला तरी अंधार पडताच येथे स्मशान शांतता पसरते. कोणीही तिथे येण्याची हिंमत करत नाही. कारण या भागात सफेद कपडे घातलेली व्यक्ती फिरत असते. आतापर्यत तिने ज्यांच्याकडून लिफ्ट मागितली. ते कधीच घरी परतलेले नाहीत.असा अनुभव येथील स्थानिक सांगतात.

damas-beachदमास बीच… गुजरात
गुजरातमधील दमास बीचवर हिंदूंची स्मशानभूमी असून येथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. हवेमुळे मृतदेहाची राख उडून येथील किनाऱ्यावर पसरत असल्याने वाळू काळी झाली आहे. रात्रीच्या वेळी येथून चित्र विचित्र आवाज येतात. यामुळे दिवसा जरी येथे लोकांची येजा असली तरी रात्री येथे येण्यास कोणीही धजावत नाही.mukesh-millमुकेश मिल…मुंबई

काही वर्षापूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या मुकेश मिलमध्ये शूटींग होत असतात. पण अनेक सेलिब्रिटीजला येथे काम करताना वाईट अनुभव आल्याचे सांगितले जाते. गुदमरणे, चक्कर येणे याबरोबरच सतत कोणीतरी सोबत, आजूबाजूला असल्याचे जाणवत राहते असे अनेक जणांनी सांगितले आहे. येथील एक किस्सा फार प्रसिध्द आहे. एकदा शूटींग दरम्यान एका नायिकेला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर अचानक ती पुरुषी आवाजात बोलू लागली. त्यामुळे शूटींग अर्धवट टाकून सगळ्यांनी तिथून पळ काढला होता. तेव्हापासून येथे फक्त दिवसा शूटींग होते.

sayoyसवॉय हॉटेल, मसूरी
१९११ साली या हॉटेलमध्ये फ्रान्सेस गार्नेट ऑरेम नावाच्या एका अध्यात्मवादी व्यक्तीला विष पाजून ठार करण्यात आले. पण त्याच्या मृत्यूचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. पण त्याचा आत्मा आजही या हॉटेलमध्ये असल्याचे बोलले जाते. येथील कर्मचाऱ्यांना त्याच्याशी संबंधित अनेक अनुभवही आले आहेत.

raj-kiran-lonavalaराज किरण हॉटेल, लोणावळा
लोणावळ्यात महत्वाच्या ठिकाणी असलेले हे हॉटेल आहे. हिंदुस्थानमधील हॉंटेड हॉटेल्समध्ये त्याचा पहिला क्रमांक आहे. या हॉटेलमधील काही ठराविक रुम आणि भागांमध्ये विचित्र हालचाली होत असल्याचे सांगितले जाते.

dow-hillsडॉव हिल्स…पश्चिम बंगाल
दार्जिंलिंग जवळ असलेली हे हिल्स स्टेशन आहे. या जंगल परिसरात व्हिक्टोरिया बॉईज हाय स्कूलही आहे. या परिसरात व शाळेजवळ अनेकांची हत्या करुन त्यांना येथे पुरण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर येथील अर्ध्या भागात प्रवेश बंद करण्यात आला होता. पण आजही येथे मुलांना विचित्र अनुभव येतात असे सांगितले जोते.