पाडवा आणि भाऊबीज, भेटवस्तू कोणती घ्याल?

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभरात मोठ्या धुम धडाक्यात दिवाळी साजरी होत आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये भेटवस्तू घेण्यासाठी मोठी झुंबड उडत असते. त्यातही पाडवा आणि भाऊबीज दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने भेटवस्तू घेण्यासाठी महिला व तरूणांची बाजारात गर्दी उसळली आहे. अशावेळी भेट म्हणून काय द्यावे हा प्रश्न सर्वांना पडतो, त्यातही पुरूषांना भेट देताना विशेष तारांबळ उडते. चला तर पाहूया पुरूषांसाठी काही विशेष भेटवस्तू…

कफलिंक
या दिवाळीला काही नवीन व वेगळ द्यायचे असेल तर तुम्ही कफलिंक भेट म्हणून देऊ शकता. वेगवेगळ्या रंगात व डिझाईनमध्ये कफलिंक उपलब्ध असून फॉर्मल किंवा सेमीफॉर्मल शर्टवर वापरू शकता.

cufflines

ट्रॅव्हल बॅग
बाहेर फिरायला जाताना आवश्यक वस्तू नेण्यासाठी आपल्याला बॅगची गरज भासते. त्यामुळे एखादी चांगली बॅग तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.

travel-bag

टाय सेट
फॉर्मल शर्टवर एखादा मँचिंग टायही तुम्ही भेट म्हणून देऊ शकता किंवा क्रॉस फॅशन असणारा टायही सध्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून तो देखील एक ऑप्शन तुमच्यासमोर आहे.

tie

टी-कोस्टर
सतत कॉफी किंवा चहा पिणाऱ्याची कॉफी किंवा चहा जर अचानक थंड झाला तर प्रचंड राग येतो. मग अशावेळी तो झाकण्यासाठी स्पेशल व्यक्तीचा फोटो असणारा टी-कोस्टर भेट देऊ शकता.

tea-coaster

पॉवर बँक
इंटरनेटच्या युगामध्ये मोबाइलची बॅटरी लवकर संपते त्यामुळे पॉवर बँक भेट देण्याचा वेगळा आणि गरजेचा प्रयोग तुम्ही करू शकता.

power-bank

मोबाइल कव्हर
आवडत्या व्यक्तीला त्याचा फोटो असणारा किंवा त्याच्या आवडीच्या व्यक्तीचा फोटो असलेला मोबाइल कव्हर तुम्ही बनवून देऊ शकता किंवा बाजारात उपलब्ध असणाऱ्या काही खास प्रकारची कव्हर भेट देऊ शकता.

mobile-cover

परफ्युम
एखाद्या चांगल्या ब्रँडचा परफ्युम तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.

perfume

इअरफोन
सतत काम करून थकल्यानंतर मुड फ्रेश करण्यासाठी गाणी ऐकणे कोणाला आवडत नाही. तर मग हा पर्यायही तुम्ही ट्राय करू शकता.

earphone

घड्याळ
सोनेरी, चंदेरी, डायमंड यांसारख्या अनेक प्रकारची ब्रँडेड घड्याळ तुम्ही भेट देऊ शकता.

watch