‘सरगम’ ठरला शेवटचा चित्रपट

21
girish-karnad-sargam-marathi movie shooting

सामना ऑनलाईन, मुंबई

कर्नाड यांनी ‘सरगम’ या मराठी चित्रपटातून तब्बल 33 वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनर्पदार्पण केले होते. ‘उंबरठा’नंतर कर्नाड यांनी कोणताही मराठी चित्रपट केलेला नव्हता. ‘सरगम’ या त्यांच्या आयुष्यातील अखेरचा चित्रपट ठरला. आयुष्यात सर्व काही मिळवल्यानंतर हे सगळं म्हणजे आयुष्य नव्हे, असा विचार करून एक व्यक्ती  जंगलात निघून जाते आणि पुढचे आयुष्य तिथेच व्यतीत करते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या व्यक्तीची भूमिका कर्नाड यांनी साकारली आहे. चित्रपटाची कथा त्यांना विलक्षण आवडली आणि त्यांनी लगेचच काम करण्यास होकार दिला. ‘सरगम’ चित्रपट सेन्सॉरमध्ये अडकला असून तो लवकरच प्रदर्शित करू, असे निर्माता महेंद्र केसरी आणि दिग्दर्शक शिव कदम यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या