दारूला महिलेचे नाव दिल्यास विक्री वाढते; गिरीश महाजनांचा अजब सल्ला

सामना ऑनलाईन । नंदुरबार

जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केलं. दारूची विक्री वाढण्यासाठी त्याला महिलांचे नाव दिल्यास त्याची विक्री निश्चित वाढेल. त्यामुळे साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ ठेवण्याचा अजब सल्ला महाजन यांनी भर सभेत दिला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामास आज प्रारंभ झाला, त्या कार्यक्रमात महाजन बोलत होते.

कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी कारखान्याची माहिती सभेत दिली. त्यात त्यांनी आपल्याकडे डिस्ट्रिलरी प्रकल्प आहे मात्र मद्याची विक्री कमी होते, असं सांगितले. त्यानंतर हाच मुद्दा धरून गिरीश महाजन म्हणाले, “राज्यात सर्वाधिक देशी दारूची विक्री कोपरगावचे नेते शंकरराव काळे यांच्या कारखान्याची होते. त्यांच्या कारखानानिर्मित दारूचे नाव ‘भिंगरी’ आहे. तर माजी आमदार कोल्हे यांच्या कारखान्यातर्फे निर्माण होणाऱ्या मद्याचे नाव ‘ज्यूली’ आहे. त्याचप्रमाणे बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते. ही वस्तुस्थिती आहे. मद्य व तंबाखूजन्य पदार्थांना असलेली नावे बहुतांशी महिलांची आहेत. जसे विमल, केसर गुटखा हे माव्याचे प्रकार बंदी असताना विकले जातात. त्यामुळे सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ करावे.”

  • Chandrakant Kulkarni

    girish bapat tumhi ya daru dhosun gatarat ka lolat nahi tumche hi nav soil mantri lokanin jantela changli syikvan dywi hi jantechi aapesha aaste