सुट्टी घालवण्यासाठी क्रूझवर आलेल्या तरुणीवर बलात्कार, न्यायालयाने आरोपीला सोडले

72

सामना ऑनलाईन। इटली

आईवडिलांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी क्रूझवर आलेल्या एका सतरा वर्षीय तरुणीवर गुरुवारी पहाटे केबिनमध्ये बलात्कार करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. मूळच्या इंग्लडच्या असलेल्या या तरुणीने एका इटलीच्या तरुणावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्याला अटक करण्यात आली. पण हे प्रकरण आमच्या देशाच्या हद्दीत येत नसल्याने स्पेनमधील न्यायालयाने आरोपीला सोडून दिले.

पीडित मुलगी आई वडिलांसोबत इटली फिरायला आली होती. येथील मेडिटेरेनियन समुद्राची सफर करण्यासाठी ती क्रूझवर आली होती. मात्र गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास इटलीतल एका व्यक्तीने तिला केबिनमध्ये ढकलेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीने तात्काळ ही माहिती पालकांना दिली. त्यांनी याबद्दल शिपच्या कॅप्टनला सांगताच त्याने याबद्दल स्पेन पोलिसांना कळवले. स्पेननधील वेलेनसिया येथे शिप पोहचताच तेथील पोलिसांनी आरोपीला अटक केली.

विशेष म्हणजे आरोपीचे वय 18 वर्ष असल्याने व ही घटना स्पेन बाहेर घडल्याने न्यायालयाने आरोपीला सोडून दिले. मात्र याप्रकरणी पनामा, यूके आणि इटली या तीन देशांकडे अपील करणार असल्याचे स्पेन न्यायालयाने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या