अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

अज्ञात वाहनाच्या धडकेत शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पुणतांबा फाटा-झगडे फाटा रस्त्यावरील पवार वस्तीनजीक हा अपघात झाला. श्रुती रामनाथ कांदळकर (१५) असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रुती संजीवनी इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे पहाटे आपल्या सायकलवरून फेरफटका मारण्यासाठी ती घराबाहेर गेली होती. दरम्यान पवार वस्तीनजीक रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने अति रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला. धर्मा कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.