केसांनी केलं स्टार, ६ महिन्यांच्या चिमुरडीचे हजारो फॉलोअर्स

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरातील अनेक लोक केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. काही लोकांना कमी वयात केसं गळण्याची समस्या असते तर काहींना केसं पांढरे होण्याची समस्या असते. परंतु याच केसांमुळे एका चिमुरडीला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले आहे. ही चिमुरडी फक्त सहा महिन्यांची आहे. पण इंटरनेट्या या मायाजालामध्ये तिचे आतापासूनच हजारो फॉलोअर्स आहेत.

जपानमधील सहा महिन्यांची बेबी चांको सध्या आपल्या अजब-गजब केसांमुळे चर्चेत आली आहे. लहान वयातील तिच्या घनदाट आणि काळ्याभोर केसांकडे पाहिल्यावर प्रत्येक जण अचंबित होत आहे. याच मुळे जगभरात तिचे फॉलोअर्स आहेत आणि त्यात वाढ होत आहे. चांको हिच्या नावाने इन्स्टाग्रामवर उघडण्यात आलेल्या अकाऊंटवर तब्बल ७० हजार फॉलोअर्स आहेत. या अकाऊंवरून तिचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट व लाईक्सचा पाऊस पडतो.

डॉक्टरांनी तिच्या या घनदाट आणि काळ्याभोर केसांबाबत माहिती देताना सांगितले की, चांकोच्या केसांची वाढ जेनेटिक्स आमि एथिनिसिटीने प्रभावित आहे. आईच्या पोटात उच्च स्तरातील हार्मोनच्या संपर्कात आल्याने अशा प्रकारची मुलं जन्माला येतात. काही वेळा हार्मोन्सचा स्तर घटल्याने मुलांच्या केसांची वाढ अचानक थांबते आणि नवीन केसं उगवण्यास सुरुवात झाल्यावर जुने केसं गळून जातात. नंतर उगणारे केसं मजबूत असतात व त्याचा रंगही वेगळा असतो.