भुताच्या प्रेमात याडं लागलेल्या तरुणीला व्हायचंय भुताच्या बाळाची आई

सामना ऑनलाईन । लंडन

सोशल मीडियावर सध्या इंग्लंडमधील एका तरुणीच्या प्रेमकहाणीने खळबळ उडवली आहे. अॅमस्थिस्ट रिल्म असे तिचे नाव आहे. ती सध्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. पण तिचे प्रेम कोणा व्यक्ती किंवा प्राण्यावर नसून चक्क एका भुतावर आहे. आपल्या या अदृश्य प्रेमाबरोबर ती सिरीयस रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत आहे. एवढेच नाही तर या भुताच्या बाळाची आई होण्याची तिची इच्छा आहे.

ज्या व्यक्ती सामान्य लोकांना दिसत नाहीत, अशा अदृश्य व्यक्ती म्हणजेच भूत आपल्याला दिसत असल्याचे आपल्याशी बोलत असल्याचा दावा रिल्मने केला आहे. भूत आयुष्यात येण्याआधी रिल्मचे एका तरुणावर प्रेम होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण रिल्मचा भावी पती कामानिमित्त सतत बाहेर असायचा. यानदरम्यान तिच्या आयुष्यात हे भूत आले. हे कळताच रिल्मच्या भावी पतीने तिच्याशी नाते तोडले व तो निघून गेला.

११ वर्षांपासून आपण भुतांच्या सहवासात राहत असून त्यांच्याबरोबर सुरक्षित वाटत असल्याचं रिल्मने सांगितलं आहे. रिल्म जास्तीत जास्तवेळ आपल्या भूत प्रियकरासोबत घालवते. तो दिसत नसला तरी तो माझ्या जवळपास असल्याचं मला जाणवत असल्याचं रिल्मचं म्हणणं आहे. रिल्मच्या या भूतप्रेमाने तिच्या घरच्यांची मात्र झोप उडाली आहे. पण भुताबरोबरचं नातं खरं असून ते अजून घट्ट व्हावे यासाठी रिल्मला त्या भुताच्या बाळाची आई व्हायचं आहे.

summary…girl-is-in-a-serious-relationship-with-a-ghost