पाचव्या मजल्यावर मुलीचा शोले स्टाईल धिंगाणा, पोलिसांची उडाली भंबेरी


सामना ऑनलाईन । लातुर

लातुरमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने बांधकामधीन  इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास लातुरच्या शिवाजी चौकाजवळील इमारतीवर चढून एक तरुणी जोर जोराने ओरडत होती. रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तिला पाहिले आणि एकच गोंधळ उडाला. काही लोकांनी याबाबातची माहिती पोलिसांना दिली. मात्र अनेक प्रयत्न करूनही मुलगी उतरत नसल्याने पोलिसांचीही भंबेरी उडाली होती.

इमारतीच्या पाचव्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाची गाडी आली होती. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अखेर दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी मुलीची समजूत काढून तिला ताब्यात घेतले. दरम्यान, तिने हा प्रकार का केला याबाबत तिची चौकशी सुरु आहे.