ग्लॅमरस साडी

पूजा पोवार,(फॅशन डिझायनर) [email protected]

हिंदुस्थानी संस्कृती आणि परंपरांचे प्रदर्शन करणाऱया साडीला फॅशन जगतात फार महत्त्वाचे स्थान आहे. लग्न  समारंभासह फॅशन शोमध्ये मॉडेल्स विविध प्रकारच्या साडय़ा परिधानकरून संस्कृती आणि कलेचे प्रदर्शन घडवतात. हिंदुस्थानातल्या फॅशन शोजमधला सर्वात नामांकित फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन विक. यंदाच्या लॅक्मे फॅशन विकच्या विंटर फेस्टिव्हमध्ये पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

lakme-fashion-week

लॅक्मे फॅशन विकच्या रॅम्पवर प्रीती झिंटाने अत्यंत पारंपरिक साडी नेसून तिने रॅम्प वॉक केला. आजच्या आधुनिक काळातल्या फॅशन विश्वात अजूनही भरजरी साडय़ांचे महत्त्व तसूभरही कमीझाले नाही, किंबहुना तिला अधिकाधिक ग्लॅमर प्राप्त झाले आहे. प्रीती झिंटाला दुर्गादेवीची वेशभूषा करण्यात आली होती. तिने परिधान केलेल्या साडीवर मोर, वाघ, फुलपाखरांची चित्रे होती.आपल्या संस्कृतीतूनच प्रेरणा घेऊन तिला फॅशन डिझायनरनी ग्लॅमर लूक दिला आहे. फॅशन डिझायनरने दिलेल्या ग्लॅमरमुळे या फॅशनला लॅक्मे फॅशन वीकच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळालं.

फॅशन शोमध्ये साडीचा वापर कसा होतो?

जगभरात विविध ठिकाणी फॅशन शो होतात. ज्या ठिकाणी हे फॅशन शो होतात तिथल्या साडय़ांचे कापड, साडी परिधान करण्याची पद्धत यांचा फॅशन डिझायनर अभ्यास करतात. त्यानुसारफॅशन शोची थिम तयार केली जाते. अशा वेळी कधी कधी वैशिष्टय़पूर्ण साडीवर छपाई केली जाते किंवा साडीचे मूळ कापड वापरले जाते. कधी लेदर ब्लाऊज किंवा क्रॉप टॉप, डिझायनर,फॅन्सी अशा विविध पद्धतीने फॅशन डिझायनर साडीला नवीन लूक देण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर मॉडेल त्या साडय़ा परिधान करून रॅम्पवर त्याचं प्रदर्शन करतात. जेव्हा मॉडेल किंवासेलिब्रेटी अशा प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण साडय़ा परिधान करून रॅम्प वॉक करतात तेव्हा मॉडेल आणि सेलिब्रेटींसह साडय़ांनाही प्रसिद्धी मिळते. बाजारासह फॅशन जगतात अशा साडय़ांचा नवीनट्रेण्ड सुरू होतो.

सिनेतारकाही देतात साडीला प्राधान्य

साडी ही आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचं प्रदर्शन करणारं पारंपरिक वस्त्र आहे. यातून जनमानसाला आपल्या संस्कृती आणि परंपरेचं दर्शन होतं. त्यामुळे जेव्हा एखादी तारका जेव्हा साडीपरिधान करते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक उठाव आणि भारदारपणा येतो जो तिने परिधान केलेल्या कोणत्याही कपडय़ांतून येत नाही.

साडय़ांसाठी वापरल्या जाणाऱया विविध प्रकारच्या कापडावर नवनवीन प्रयोग फॅशन जगतात होत असतात. साडय़ांवरही आकर्षक डिझाईन प्रिंट कशा होतील, जेणेकरून लोकं त्याचा स्वीकारकरतील याचा फॅशन डिझायनर सतत विचार करत असतात. या सर्व गोष्टी करत असताना त्यातून आपल्या संस्कृतीला धक्का लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतो.

लोकसंस्कृतीतून साडय़ांवर प्रयोग

नऊवारी साडीला फ्युजन लुक दिला जातो. तसेच एकाच साडीवर वेगवेगळ्या प्रकारची ब्लाऊज घालून एथनिक, फ्युजन, रेट्रो किंवा बोहेनियम लूक मिळवता येतो. एकाच साडीवर चारवेगवेगळे ब्लाऊज घालून नवनवीन लूक तुम्हाला मिळवता येऊ शकतो. पारंपरिक ब्लाऊजऐवजी क्रॉप टॉप सध्या प्रचलित आहे. क्रॉप टॉप हा साडीवर घालता येतोच शिवाय जीन्स, स्कर्टअशा वेस्टर्न आउटफिटससाठीही अगदी सुटेबल असतो. ब्लॅक, ब्राउन, गोल्डन, मल्टिकलर डिझायनर ब्लाऊज एकापेक्षा एकअधिक साडय़ांवर परिधान करता येतात.

साडय़ांचा पॅटर्नचा फॅशन विश्वात वापर

डिझायनरना त्यांच्या फॅशन किंवा डिझाइन क्षेत्रात मर्यादा नाहीत. ज्या तून डिझायनरला नवीन काहीतरी करण्याची पेरणा मिळते त्याला ते प्राधान्य देतात. तशाच पद्धतीने फक्त पैठणीवरच नाहीतर सध्या चंदेरी, इरकली, टोकपदरी, नारायण पेठ अशा विविध प्रकारच्या साडय़ांवर फॅशनचे प्रयोग केले जात आहेत. प्रत्येक फॅशन शोची थिम; असते. त्या थिमप्रमाणे डिझायनर करतात.बनारसी साडीवर काम करायचं असेल तर त्या साडीवर काय नवीन प्रयोग करून शकतो. जेणेकरून ती मॉडेल किंवा सेलिब्रेटिने परिधान केल्यावर लोकं ती फॅशन म्हणून स्वीकारतील.त्यामुळे प्रत्येक डिझायनर थिमकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. येणाऱया नवीन वर्षात आणि सिझनमध्ये नवीन काय फॅशन आपण बाजारात आणू शकतो, याचा आम्ही सतत विचार करत असतो.