नवी मुंबईत दोन किलो सोन्यासह ३५ लाखांच्या नव्या नोटा जप्त

64

पनवेल : ३५ लाखांच्या नव्या नोटांसह २ किलो सोने घेऊन जाणार्‍या सहाजणांना खांदेश्‍वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस पथकाने आदई सर्कलजवळ सापळा रचून पहाटेच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या इंडिका गाडीला थांबवून गाडीची झडती घेतली असता दोन हजारांच्या ३५ लाखांच्या नोटा व सोन्याची २२ बिस्किटे असा एकूण ९० लाख ९४ हजारांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी तानाजी मेटकरे, रघुनाथ मोहिते, संतोष पवार, सूर्यकांत कांडे, देवराम सोळंकी व खुशाराम चौधरी या सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या