२६ लाखांचा सोन्याचा साठा पकडला, पण तस्कर सटकला

10

सामना ऑनलाईन, पणजी

गोव्यातील दाबोळी विमानतळावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आली आहे. बुधवारी सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत २६.४० लाख रूपयांची सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आली आहे. विमानाच्या सीट खालील एअरबॅगच्या पॉकेटमध्ये अज्ञात हवाई प्रवाशांनी ९२८ ग्रॅम वजनाचे सोने तस्करीच्या हेतूने ठेवले होते. मात्र,ते सोने सोबत घेऊन विमानतळाबाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही

सीमाशुल्क विभागाला दुबईहून गोवामार्गे सोन्याची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीमुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर सीमाशुल्क विभागाचे अधिकारी बारीक नजर ठेवून होते. दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानामध्ये एका प्रवाशाने सीट खालील एअरबॅगच्या पॉकेटमध्ये या अधिकाऱ्यांना सोने सापडले. दोन छोटय़ा पॅकेटमध्ये दहा तोळ्याची ८ सोन्याची बिस्किटे लपविण्यात आली होती. तस्करी करणारी व्यक्ती मात्र अधिकाऱ्यांना सापडली नाहीये. त्या सीटवर बसलेल्या प्रवाशाची माहिती जमवण्याचा प्रयत्न सुरू असून त्याची माहिती मिळाल्यानंतर तस्कर कोण होता हे कळू शकेल असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या