मुकुट चोरणाऱ्या पुजाऱ्याला अटक

26

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिरे व्यापाऱ्याच्या घरातील देवाचा मुकुट चोरीप्रकरणी पुजाऱ्याला कांदिवली पोलिसांनी हर्षल शाह याला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कांदिवली परिसरात हिरे व्यापारी राहतात. गेल्या सहा महिन्यांपासून हर्षल त्यांच्याकडे पुजाऱ्याचे काम करायचा. परिमंडळ 11 चे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन पोंदकुले यांच्या पथकातील उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, संदीप पाचांगणे, शिंगरे आणि पथकाने तपास करून हर्षलला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या