सिंधू घडवणार का इतिहास? आज आहे ‘सुवर्ण’संधी

सामना ऑनलाईन । नानजिंग

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूकडे सर्व देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. नानजिंग येथे होणाऱ्या बॅडमिंटनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने धडक मारली आहे. रविवारी तिचा सामना तिची कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या स्पनेच्या कॅरोलिना मारिनशी होणार आहे. जर कॅरोलिनाला पछाडण्यात सिंधू यशस्वी ठरली तर बॅडमिंटनचे विश्वविजेतेपद जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरणार आहे. जर असं झालं तर हिंदुस्थानी क्रीडाविश्वासाठी तो एक ऐतिहासिक सुवर्णक्षण ठरणार आहे.

सिंधूने गेल्या वर्षीही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तेव्हा तिचा सामना जपानच्या नोजोमी ओकुहाराशी झाला होता. पण, त्यावेळी नोजोमीकडून सिंधुला पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे मारिन ही तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होत आहे. आता सिंधूला जिंकण्यासाठी आपले सर्व प्रयत्न पणाला लावावे लागणार आहेत. २

०१६मध्ये ऑगस्ट महिन्यातच ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही सिंधुला कॅरोलिनाने मात दिली होती. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्याची एक चांगली संधी सिंधुकडे आहे. कॅरोलिना आणि सिंधुने एकमेकींविरुद्ध आजपर्यंत ११ सामने खेळले गेले आहेत. त्यातील ६ सामन्यांत कॅरोलिना तर पाच सामन्यांत सिंधुचा विजय झाला होता.

summery- Golden chance for sindhu to win Badminton World championship