फसवणूक करणाऱ्या जाहिरातींवर गुगलने घातली बंदी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या एका वर्षात लोकांची फसवणूक करणाऱया तब्बल 2.3 अरब जाहिरातींवर गुगलने बंदी घातली आहे. गुगलने नुकतीच एक पॉलिसी जाहीर केली या पॉलिसीनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिराती बॅन करण्यात आल्या आहेत. गुरुवारी गुगलने ही माहिती दिली.

‘बॅड ऍड रिपोर्ट 2018’ मध्ये दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी दरदिवशी 60 लाख जाहिराती गुगलने बंद केल्या. युजर्सना खऱया आणि माहितीपूर्ण जाहिराती दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या जाहिराती रोखणे हे आमचे प्राथमिक काम आहे. कंपनी जाहिरातींची शहानिशा करण्यासाठी बराच पैसा खर्च करीत आहे. गेल्या वर्षी 7.34 लाख जाहिरातदार आणि ऍप डेव्हलपर गुगल ऍड नेटवर्कवरून बाद करण्यात आले होते.