वर्ल्डकपचा अंतिम सामना ‘या’ दोन संघात होईल, सुंदर पिचाई यांचे भाकीत

40

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये (ICC Cricket World Cup 2019) इंग्लंडमध्ये सुरू आहे. अद्याप विश्वचषकातील बऱ्याच लढतीत बाकी असल्या तरी फायनलमध्ये कोणते दोन संघ जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे. प्रत्येक जण आपले भाकीत वर्तवत आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील याबाबत मागे नाही. त्यांनीही याबाबत आपली भविष्यवाणी वर्तवली आहे

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी माजी विजेता हिंदुस्थान आणि यजमान इंग्लंड यांच्यातच अंतिम लढत होईल असा विश्वास गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. हिंदुस्थानी वंशाचा अमेरिकन व्यावसायिक पिचाई टीम इंडियाचा मोठा चाहता आहे. या दोन संघांत विश्वचषकाची फायनल झाली तर मी हिंदुस्थानी संघासाठीच चीअरअप करेन असेही पिचाई म्हणाले. अर्थात टीम इंडियाला न्यूझीलंड आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल असेही पिचाई यांना वाटते. पिचाई वॉशिंग्टनमध्ये हिंदुस्थानी आणि अमेरिकन उद्योजकांच्या मेळाव्यात बोलत होते. तेव्हा त्यांनी हे भाकीत वर्तवले.

आपली प्रतिक्रिया द्या