जाणून घ्या काय आहे आजचे गुगल डूडल

सामना ऑनलाईन । मुंबई

आज गुगलने जपानचे महान संख्याशास्त्रज्ञ हिरोसुजु एकाइक यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त डूडल बनवले आहे. १९७०च्या दशकच्या सुरुवातीला त्यांनी मॉडेल निवडीसाठी एक सूत्र तयार केले. एकाइक इन्फॉर्मेशन क्राइटीरियन (एआयसी) या नावाने हे सूत्र ओळखले जाते. एआयसी या सूत्राला मॉडेल निव़डीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

सांख्यिकीशास्त्र क्षेत्रात त्यांच्या मोठ्या योगदानासाठी त्यांना २००६ मध्ये क्योटो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एकाइक यांचे ४ ऑगस्ट २००९ मध्ये निधन झाले.