गुगल मॅपवर आता रस्त्यांचे चढउतार कळणार


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गाडी चालवताना असो की, सायकलिंग किंवा धावणे असो रस्त्यांचे चढउतार या पुढे गुगल मॅपच्या साहाय्याने आता कळणार आहेत. त्यासाठी गुगल मॅपवर एलिवेशन चार्ट हे नवीन फिचर्स देण्यात आले आहे. सध्या तरी हे फिचर्स आईओएस गुगल मॅप्स युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सकाळचा धावण्याचा, चालण्याचा व्यायाम असो की, सायकलिंग करणे असो, गाडी चालवणे येणाऱ्या रस्त्यावर किती चढतार आहेत, हे यामुळे कळणार आहे. शरीरातील कॅलरीज कमी करायचे असतील तर सायकलिंगसाठी चढ असलेले रस्ते कोणते हेही पाहता येणार आहे. अॅपल वॉच असलेला ग्राहक ऍपला घड्याळासोबत जोडू शकतो.

कम्युट फिचर
घरी जाण्यासाठी किंवा कामाला जाण्यासाठीचा रस्ता या फिचरने ग्राहक निवडू शकतो. हे नवीन फिचर वाहन चालवणे आणि ट्रांसिट टॅब्सची जागा घेईल. कम्युटवर टॅप केल्यावर घरी जाण्यासाठी किंवा कामावर जाण्यासाठी असे दोन पर्याय येतील. या दोन्ही पर्यायाव्यतिरिक्त तिसरा पर्याय निवडण्याची मुभाही देण्यात आली आहे. कम्युट ऑप्शन गुगल मॅप्सच्या मेन्यूबारमध्ये मिळेल. मात्र, सध्या तरी ही सेवा मर्यादित आहे.

इव्हेंट सेक्शन फिचर
गुगल ऍपमध्ये अपडेट केल्यानंतर आता इव्हेंट सेक्शनही पाहायला मिळणार आहे. त्या ग्राहकाला आजूबाजूच्या परिसरात होणारे चित्रपट, शो आणि कार्यक्रमांची माहिती मिळणार आहे. मात्र, सध्या तरी हे फिचर मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे.

summary- google map to inform road conditions