गुगलवर जा; ९ हजार कमवा!

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

गुगलचे ‘तेज’ हे पेमेंट अॅप डाऊनलोड केल्यावर तसेच मित्र किंवा इतर कुणालाही या अॅपचे इन्व्हाईट पाठवून एक साखळी तयार झाल्यावर तुम्ही जास्तीत जास्त ९ हजार रुपये कमावू शकणार आहात. तेज अॅपचे इन्व्हाईट मित्रमैत्रिणी किंवा संपर्कातील कुणालाही पाठवता येईल. तुमच्याबरोबरच ज्यांना तुम्ही या अॅपचे इन्व्हाइट पाठविले आहे तेदेखील पैसे कमावू शकतात. हे अॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला एका मिनिटाला ५१ रुपये मिळणार आहेत. सर्वात आधी तुम्हाला गुगल तेज अॅप डाऊनलोड करावे लागेल. अॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला ५१ रुपये मिळतील. तुम्ही कुणालाही या अॅपची लिंक पाठवल्यास अतिरिक्त पैसेही मिळतील. तुम्ही ५० रेफरल अॅवॉर्ड जिंकून जास्तीत जास्त ९ हजार रुपये मिळवू शकता.