गोपी जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्र, सिऊल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये अकरावा

6

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आशियाई चॅम्पियन धावपटू गोपी थोनाकल याने सिऊल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये अकरावे स्थान पटकावून येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दोहा येथे होणाऱया जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे तिकीट बुक केले.

30 वर्षीय गोपी थोनाकलने 2 तास 39 मिनिटे व 3 सेकंद अशा वेळेत शर्यत पूर्ण करून जागतिक चॅम्पियनशिपचे तिकीट बुक केले. जागतिक चॅम्पियनशिपची पात्रता 2.16.00 इतकी आहे. याआधी हिंदुस्थानच्या शिवनाथ सिंगने 2.12.0 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला. गोपी थोनाकलने 2017 साली आशियाई चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याला 25व्या स्थानावर समाधान मानावे लागले.