तृतीयपंथीयाकडून 25 हजारांची लाच घेताना एपीआय ट्रप

10
प्रातिनिधीक फोटो


सामना प्रतिनिधी । मुंबई

तृतीयपंथीयाकडे 50 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना गोवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात (48) हे ट्रप झाले. त्यांना पैसे घेताना ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लक्ष्मी (नाव बदललेले) या तृतीयपंथीयाच्या मामेभावावर गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुह्यात त्याला अटक होऊन सध्या तो जामिनावर बाहेर आहे. आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई न करता त्याला मदत करण्यासाठी एपीआय दीपक खरात यांनी लक्ष्मीकडे 50 हजारांची मागणी केली. लाच द्यायची नसल्याने लक्ष्मीने ऍण्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली आणि खरात यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर लक्ष्मीकडून तडजोडीअंती ठरलेली 25 हजारांची रोकड घेताना पथकाने दीपक खरात यांना रंगेहाथ पकडले.

आपली प्रतिक्रिया द्या