गटविकास अधिकाऱ्याने केली गरीब वृध्द दांम्पत्याची दिवाळी साजरी

1

सामना प्रतिनिधी । मेहकर

येथील सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे यांनी एका गरीब वयोवृध्द दांम्पत्याची भेट घेऊन त्यांना किराणा, मिठाई व आर्थिक मदत देऊन त्यांची दिवाळी साजरी केली. सामाजिक कार्याची आवड असणारे मेहकर येथील सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे हे बुधवारी तालुक्यातील घुटी पारडी येथे गेले असता त्यांनी वयोवृध्द गरीब कुटूंब हिरामन शिरोळे यांची भेट घेऊन विचारपूस केली.

दिवाळीचा दिवस असल्याने या जोडप्यास किराणा,मिठाई व आर्थिक मदत दिली. यावेळी विलास आव्हाळे व लक्ष्मण ठाकरे हजर होते. या आधी सुध्दा पाटोळे यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांचा वाढदिवस असतांना त्या दिवशी तालुक्यातील खंडाळा येथील आत्महत्या केलेले शेतकरी संतोष मानघाले यांच्या परिवारास अकरा हजार रूपयांची मदत दिली. गुरुवारी त्यांनी गरीब कुटूंबास मदत दिल्यावर पारडी येथील मदन चव्हाण यांनी 19 ऑक्टोबरला आत्महत्या केली होती त्या परिवाराचीही भेट घेतली व सांत्वन केले.