‘बेटी बचाओ’ योजनेखाली ३० लाख बोगस अर्ज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेखाली गोरगरीबांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेखाली जवळ जवळ ३० लाख बोगस अर्ज सरकारकडे आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

‘बेटी बचाओ’ या योजनेखाली तुमच्या मुलीस दोन लाख रुपये मिळतील अशी बतावणी करून काही महाभागांनी एक बोगस अर्ज पालक, आईवडिलांना ५० ते १०० रुपयांना विकले. हे अर्ज या बदमाशांनी गोरगरीबांना भरून देऊन केंद्राकडे पाठवले पण अशा प्रकारची कोणतीही योजना नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. या अर्जावर फोटो, बँक, आधारकार्डवरील माहितीसह इतर खासगी माहितीही आईवडिलांनी दिली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने महिला बाल कल्याण विभागाने विधी, गृह आणि माहिती प्रसारण मंत्रालयासोबत बैठकही घेतली. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे.