पोलिसांना कायमस्वरूपी हक्काची घरे देण्याचा निर्णय – केसरकर

3

सामना प्रतिनिधी । नेवासा

पोलिसांना कायमस्वरूपी हक्काची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. गुरुवारी संभाजी नगरकडे बैठकीसाठी जात असतांना केसरकर यांनी नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर व देवगड येथील दत्त मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी नेवासा येथे ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख तर देवगड येथे यांनी केसरकर यांचा सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार व युवासेनेचे तालुका उपाध्यक्ष नीरज नांगरे, विकास शेजुळ, अविनाश माळवदे, जालिंदर गवळी, उपस्थित होते

केसरकर म्हणाले की, शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळात संकटाशी सामना करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली. नेवासा पोलीस ठाणे व पोलीस वसाहती बाबत प्रश्न विचारला असता दीपक केसरकर यांनी आम्ही आता पोलिसांना कॉलनीमधील घरे देण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले. तसेच कोणत्याही खाजगी कंपनीची फ्लॅट सिस्टीम असेल तर शासन सदरची फ्लॅट सिस्टीम विकत घेऊन पोलिसांना हक्काचे घर देत येईल असे त्यांनी सांगितले.